Tarun Bharat

‘हॅकाथॉन’ विद्यार्थ्यांसाठी सर्व क्षेत्रात रोजगारांच्या संधी निर्माण करील- मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल

फर्मागुडी येथे नॉनस्टॉप 48 तासाच्या ‘हॅकाथॉन’ कोडींगचा समारोप : बिटस् पिलानी गोवा टीम ठरली पोलिसासाठी ‘टेकीज हॉक्स’,आयआयटी गोवा द्वितीय, जीईसी टीम तृतीय स्थानी

प्रतिनिधी /फोंडा

मेनप्रेम कम्प्युटर ते डेस्कटॉप कम्प्युटर अशा दशकभरात बदलणाऱया तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यानी स्वतःला अपडेट करीत रहावे. आजच्या विद्यार्थ्यानी भविष्यातून यशस्वी ‘टेकीज’ म्हणून ओळख निर्माण करताना नाविन्याची साथ सोडू नये. खासगी क्षेत्रातही नैतिक हॅकथॉनला येत्या काळात भयंकर मागणी वाढणार असून हॅकाथॉन उपक्रमातूक घेतलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यानी सदुपयोग केल्यास रोजगाराची अनेक दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल यांनी केले.

फर्मागुडी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यायलाच्या संकुलात शनिवार 10 सप्टे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या नॉनस्टॉप 48 तासांच्या ‘हॅकथॉन’ या महाविद्यालयीन विद्यार्थी व गोवा पोलीस प्रेन्डली उपक्रमाच्या काल सोमवारी झालेल्य़ा  समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत भारताची मिसाईल वुमन म्हणून परिचित डॉ. टेसी थॉमस, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश बी. लोहानी, आयआयटीचे संचालक प्रा. बी. के. मिश्रा उपस्थित होते. तसेच पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, पोलीस अधिक्षक अभिषेक धानीया, सायबर क्राईम अधिक्षक निधीन वालसन उपस्थित होते. गोवा पोलिसांकडून पहिल्यांदाच आयोजित केलेल्या हॅकथॉन उपक्रमात राज्यातील दहा नामांकित महाविद्यालयातील 53 विद्यार्थ्यानी नॉनस्टॉप 48 तास संगणकावर कोडींग करीत गोवा पोलिसांनी दिलेल्या सात विषयावर आपल्या तांत्रिक बुद्धिमत्ता वापरून सायबर गुन्हय़ावर महत्वाचे टिपस्सह उपाय सुचविले. त्यानंतर गोवा पोलीस टीमसमोर परीक्षकांच्या उपस्थित पेलेल्या सुचनावरही समर्पक उत्तरे दिली. गोवा पोलिसांनी आयआयटी गोवा, बिटस् पिलानी गोवा व गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाशी या उपक्रमात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती सोडू नये- डॉ. टेसी थॉमस

 मिसाईल वुमन म्हणून परिचित असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविताना महत्वाचे बाळकडू पाजले. विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालीत संशोधक वृत्ती जोपासावी, फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहावे कारण अपघातानेच अनेक संधोशने नोंद झाल्याची माहिती त्यानी यावेळी दिली. अग्नी-4 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या वैज्ञानिक व भारतीय संरक्षक दलात महत्चाचे योगदान देणाऱया डॉ. टेसी थॉमसकडून विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हे व संरक्षक दलातील विषयावर माहिती घेतली.

बिटस् पिलानी टिम ठरली अव्वल ‘हॅकाथॉन’ टेकीज हॉक्स  

हॅकाथॉन उपक्रमाअंतर्गत सायबर गुन्हय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाविन्यपुर्णरित्या चित्रफितीद्वारे सादरीकरण केलेल्या बिटस् पिलानी गोवा टिमच्या बिटस् ऍन्ड पिसीस टिमला रू. 25 हजाराचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक मुख्य सचिव गोएल यांनी प्रदान केले. द्वितीय आयआयटी गोवा यांना रू. 15 हजार व प्रशस्तीपत्रक तर तृतीय स्थानी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय यांना रू. 10 हजार व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अधिक्षक निधीन वालसन यांनी केले. सुत्रसंचालन महिला पोलीस निरीक्षक रिमा नाईक यांनी केले.

Related Stories

युवा भंडारी समितीचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

श्री दामोदर भजनी सप्ताहाला प्रारंभ

Patil_p

अवकाळी पावसाने बार्देशला झोडपले

Amit Kulkarni

मनोज परब थिवी, वाळपईतून लढणार !

Amit Kulkarni

सावईवेरेत कदंब बस बंद पडण्याचे सत्र

Amit Kulkarni

राज्यात जोरदार पाऊस

Patil_p