Tarun Bharat

फॅशन डिझायनर प्रथ्युषा गरिमेला हीचा संशयास्पद मृत्यु

पोलिसांना आत्महत्येचा संशय

Advertisements

ऑनलॉईन टिम / हैदराबाद

प्रसिध्द फॅशन डिझायनर प्रथ्युषा गरिमेला ही शनिवारी हैदराबादमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे असे पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

डिझायनर प्रथ्युषा गरिमेला तिच्या बंजारा हिल्स नावाच्या अपार्टमेंटमध्ये बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. तिला दवाखान्यात हलवले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनासाठीसाठी तिचा मृतदेह उस्मानिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला असून तिच्या अपार्टमेंटमधून कार्बन मोनॉक्साईडची डबी जप्त करण्यात आली आहे असे पोलिसांनी सांगितले असल्याचे बाबतचे वृत्त एएनआयने दिले. या घटनेनंतर बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात संशयास्पद मृत्यूच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फॅशन डिझायनर असलेली ‘प्रथ्युषा गरिमेला’ हीने स्वताच्या नावाचा ब्रँड तयार केला होता. तसेच ती बंजारा हिल्स या अपार्टमेंटमध्ये फॅशन स्टुडिओ चालवत होती. तिने आपल्या करियर मध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.

error: Content is protected !!