Tarun Bharat

केसांची ग्रोथ होत नाही, केस तुटताहेत? हे घरगुती उपाय करा

Advertisements

Hair Care Tips : केस गळती ही नेहमीचीच समस्या असते. थायराईड, पीसीओडी किंवा वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाने केस तुटायला लागतात. अशावेळी टेन्शन यायला लागते. मात्र काही घरगुती उपाय केले तर यावर मात करता येवू शकते. यासाठी आहारात व्हिटामीन बी, ए, ई,बी १२ चा समावेश करा. यासोबतच ओमेगा ३, फॅटीअॅसिड, आयर्न, प्रोटीन, बायोटीन, व्हिटामीन ए, सी, डी योग्य प्रमाणात आहारात घ्या. केसगळती थांबवण्यासाठी जेवनात नियमित कढीपत्त्याचा वापर करा. त्य़ाचबरोबर आवळ्याचा रस घ्या. यामुळे केसगळती निश्चितच थांबेल. यासाठी काही टिप्स देणार आहोत ते जाणून घ्या आणि वापरायला सुरु करा. तुम्हाला फरक जाणवेल.

आवळ्याचा रस कसा बनवायचा

आवळ्याचा रस रोज उपाशी पोटी पिल्याने तुम्हाला दीड महिन्यात फरक जाणवेल. मधुमेह रूग्णासाठी हा रस खूपच फायदेशीर ठरतो. यासाठी एक आवळा, एक इंच आल्ले आणि एक चमचा मेथी जिला रात्रभर भिजवा. हे तिन्ही साहित्य एकत्र मिक्सरला फिरवून घ्या. त्याचा रस काढून घ्या. तो उपाशीपोटी घ्या. दीड महिना हा प्रयोग केल्यास निश्चित फायदा होतो.

कांद्याचं तेल अस बनवा

केस दाट होण्यासाठी केसांना तेल गरजेचं असतं. तुम्हाला नियमित तेल लावण शक्य होत नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तेल लावू शकता. जर तुमच्या केसांची ग्रोथ होत नसेल किंवा केस तुटत असतील , केस पांढरे होत असतील तर तुम्ही कांद्याच्या तेलाचा वापर करा. याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.

साहित्य

कांदे- २
आल्ले- १ इंच
एरंडेल तेल- १ चमचा
भिजवलेल्या मेथ्या- १ चमचा

कृती
सुरुवातीला दोन कांदे कापून घ्या. त्यात १ इंच आल्याचा तुकडा घालून मिक्सरला फिरवून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेली मेथी घाला. आता मिश्रण परत मिक्सरमधून काढून घ्या. तयार मिश्रणातील पाणी बाजूला करून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये १ चमचा एरंडेल तेल आणि २ चमचे कांद्याचा रस घ्या ते छान मिक्स करून घ्या. आता केस कंगव्याने चांगले मोकळे करून घ्या. त्यानंतर त्य़ावर वाॅटर स्प्रे किंवा साध पाणी स्प्रे करू शकता. यानंतर सेक्शन करून तुम्ही कापसाच्या मदतीने मुळांना तेल लावून घ्या. याचा मसाज करायचा नाही. हे लावून झाल्यानंतर एका तासाने आंघोळ करा. आठवड्यातून एकदा केसांना अॅप्लीकेशन करून घ्या. शाम्पू करताना तो डायरेक्ट लावू नका. शाम्पूमध्ये थोडं पाणी वापरा मग तो लावा.

Related Stories

जोडीदार शोधताय?… ‘या’ टीप्स करा फॉलो

Archana Banage

या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात!

Kalyani Amanagi

सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

Kalyani Amanagi

घरच्या घरी असे बनवा लिप बाम; ओठ होतील सुंदर मुलायम

Archana Banage

अभिनयात रस नाही !

tarunbharat

कॅरी टी -शर्ट विथ स्टाईल

Amit Kulkarni
error: Content is protected !!