Tarun Bharat

हलशीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार

Advertisements

नासीर बागवान यांचे आश्वासन : नृसिंह देवस्थानच्या रथाचे लोकार्पण

वार्ताहर / नंदगड

हलशी गाव ऐतिहासिक कदंब राजाची राजधानी होती. परंतु काळापरत्वे हलशी गावचे महत्त्व कमी होत आहे. गावच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तसेच हलशी परिसरात शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, मलप्रभा नदीतून  हलशीला पाणी आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱयांचे जीवनमान निश्चित सुधारेल, तसेच गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन नासीर बागवान यांनी नव्याने तयार केलेल्या  ऩृसिंह देवस्थानचा रथाच्या लोकार्पण सोहळय़ाप्रसंगी दिले.

हलशी येथील देवस्थानच्या रथाची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. या रथासाठी 9 लाख रुपयांचे सागवानी लाकूड निजद नेते नासीर बागवान यांनी दिले आहे. त्यांच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी सभा झाली. त्यावेळी नासीर बागवान बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत गुरव होते. त्यानंतर गावातून नव्या रथाची ट्रकमधून मिरवणूक काढण्यात
आली.

हलशी येथील श्री भुवराह लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा कदंबकालीन रथ दरवषी होणाऱया यात्रोत्सवात ओढण्यात येत होता. अलीकडे तो जीर्ण झाला आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून रथ बनविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केला. यात नासीर बागवान यांनी 9 लाखांची रोख देणगी दिली आहे. भविष्य काळात हलशीच्या विकासासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे आश्वासनही नासीर बागवान यांनी दिले. यावेळी प्रदीप पारिपत्तेदार, वासुदेव तलवार, परशराम मादार, लायकल्ली बिच्चनावर आदींची बागवान यांनी रथासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी भाषणे झाली. रथ मिरवणुकीत ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. नव्याने तयार करण्यात आलेल्या रथाची मिरवणूक हलशी परिसरातील गावातून काढण्यात येत आहे. पुढील पाच दिवस हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

Related Stories

बेनकनहळ्ळीत जुन्यांसह नवीन चेहऱयांना संधी

Patil_p

माती परीक्षण शेतीसाठी अत्यंत लाभदायक

Amit Kulkarni

शहरासह तालुक्यात रक्षाबंधन उत्साहात

Omkar B

गावातील मंदिरांमध्ये भक्तिभाव राखावा

Amit Kulkarni

बेंगळूर शहराला केवळ एकच विमानफेरी

Amit Kulkarni

खानापूर पोलीस निरीक्षक ठाण्यात कर्मचारी कमतरतेमुळे गैरसोय

Amit Kulkarni
error: Content is protected !!