वृत्तसंस्था/ माँट्रियल (कॅनडा)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रुमानियाची माजी टॉप सिडेड सिमोना हॅलेप आणि ब्राझीलची नवोदित बिट्रेझ माया यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात रुमानियाच्या हॅलेपने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 2-6, 6-3, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव अंतिम फेरी गाठली. या सामन्यात रुमानियाने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. हॅलेपने ही यापूर्वी दोनवेळा जिंकली आहे. हा उपांत्य फेरीचा सामना सव्वादोन तास चालला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात ब्राझीलच्या बिट्रेझ हेदाद मायाने झेकच्या प्लिसकोव्हाचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.