नासीर बागवानांचे स्तुत्य कार्य : ग्रामस्थांतर्फे सत्कार
वार्ताहर /नंदगड
कणकुंबी गावापासून श्री माउली देवस्थानदरम्यानचा अर्धा किलोमीटर रस्ता नादुरुस्त झाला होता. दोन वर्षांपासून ग्रामस्थांची व या रस्त्यावरून ये-जा करणाऱया भाविकांची यामुळे गैरसोय होत होती.
या रस्त्याच्या अवस्थेची सविस्तर माहिती ग्रामस्थांनी मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन व निजद नेते नासीर बागवान यांना दिली. गेल्या आठवडय़ात नासीर बागवान यांनी स्वतःचे वीस लाख रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण करून दिले आहे. त्यामुळे सर्वांची सोय झाली आहे. बागवान यांनी रस्ता करून दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले. कणकुंबी ग्रामस्थांच्यावतीने नासीर बागवान यांचा शाल, श्रीफळ व श्री माउली देवीचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री माउली देवी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बबन दळवी, उपाध्यक्ष राजाराम गावडे, सेपेटरी लक्ष्मण गावडे, प्रभाकर पंडित, डॉ. श्रीनिवास पेडणेकर, निंगाप्पा घाडी, मालोजी गवस, गुंडू गुरव, हणमंत गावडे, भिकाजी महाले, शंकर गावडे, ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश खोरवी, सदस्य रामनाथ चौगुले आदींसह ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते.