ट्रकच्या धडकेत शरीराचे नुकसान
दुर्घटनांमध्ये जीव वाचल्यावर लोक स्वतःला सुदैवी मानतात, अनेकदा दुर्घटना अत्यंत भीषण असल्याने कुणाचाच जीव वाचत नाही. परंतु अनेकदा चमत्कार म्हणून काही लोक मृत्यूवर मात करतात. अशाच प्रकारचा चमत्कार 20 वर्षीय लॉरेन्स स्कॉएरस याच्यासोबत घडला आहे. दुर्घटनेत लॉरेन्स ट्रकखाली सापडून त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. परंतु आता दुर्घटनेच्या तीन वर्षांनतर तो पाय अन् फोरआर्म नसतानाही स्वतःचे आयुष्य जगत आहे.
लॉरेन्ससोबत झालेल्या दुर्घटनेबद्दल कळल्यावर प्रत्येक जण तो वाचणे हा चमत्कार असल्याचे मानतात. एका बांधकामस्थळी लॉरेन्स दुर्घटनाग्रस्त झाला होता. तो एका फोर्कलिफ्टच्या तावडीत सापडला होता. मूळचा ग्रेट फॉल्स इन मोंटानाचा रहिवासी असलेला लॉरेन हेमीकोर्पोरेक्टमीचा रुग्ण आहे. तो मागील दोन वर्षांपासून पायांशिवाय जगत आहे.
निधी जमविण्याचे काम
2019 मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर लॉरेन स्वतःसाठी निधी जमवत आहे. सप्टेंबर 2019मध्ये एका ब्रिजचे काम करताना ही दुर्घटना घडली होती. ब्रिजवरून तो 50 फूट खाली कोसळला होता, तर खालून जाणाऱया ट्रकने त्याचे हात अन् पाय चिरडले होते. तरीही लॉरेन शुद्धीत होता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी त्याने डॉक्टरांना शस्त्रक्रियेद्वारे अर्ध शरीर कापून टाकण्यास सांगितले होते.
डॉक्टरांना नव्हती अपेक्षा
अर्धे शरीर कापण्याच्या विनंतीनंतरही डॉक्टरांना तो वाचणार याबद्दल विश्वास नव्हता. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू होईल असे डॉक्टरांना वाट होते. परंतु लॉरेनने ही भीती खोटी करून दाखविली. तो यातून बचावला आणि आता स्वतःच्या बायोनिक हातांसाठी देणगी जमवत आहे.