Tarun Bharat

शिक्षक भरतीसाठी हलशीवाडी ग्रामस्थ आक्रमक

Advertisements

कार्यालयात छेडले आंदोलन : आठवडय़ात शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी

वार्ताहर /नंदगड

गेल्या सहा वर्षापासून शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आक्रमक झालेल्या हलशीवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱयांना धारेवर धरले. तसेच येत्या आठ दिवसांत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास दररोज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून शाळेमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्यावषी पालक व शाळा सुधारणा कमिटीने सातत्याने मागणी केल्यामुळे अतिथी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र यावेळी मागणी करूनदेखील अतिथी शिक्षक देण्यात आलेला नाही. त्यामुळे एका शिक्षकावरच विद्यार्थ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकावर सरकारी कामांचा बोजा असल्याने त्यांना विविध कामांसाठी बाहेर जावे लागते. त्या काळात विद्यार्थ्यांना शिकविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हलशीवाडी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडले. हलशीवाडीसह खानापूर तालुक्मयातील ज्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात असताना देखील शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलावून जोरदार आंदोलन करण्याचा इशारा हलशीवाडी ग्रामस्थांनी दिला.

यावेळी कार्यालयातील व्यवस्थापक वाघमारे यांनी गटशिक्षणाधिकारी यकुंडी यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसात नवीन शिक्षकाची नेमणूक केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे विनायक देसाई, अर्जुन देसाई, नारायण देसाई, मिलिंद देसाई, विठ्ठल देसाई, मल्लाप्पा देसाई, सुधीर देसाई, सुरज देसाई, रमेश देसाई, नरसिंग देसाई, महाबळेश्वर देसाई, मनोज देसाई, प्रसाद देसाई, प्रवीण देसाई, राजू देसाई, राजश्री देसाई, रामा देसाई, बळवंत देसाई, सुरेश देसाई यांच्यासह पालक व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

पेरणीपूर्व मशागतीला आला वेग

Amit Kulkarni

समाज परिवर्तनासाठी बसवेश्वरांचे अमूल्य योगदान

Amit Kulkarni

कंग्राळी शिवारातील भातपिकाला लिफ्ट एरिगेशनद्वारे पाणी पुरवा

Patil_p

सेव्हेंटीन ट्रेकर्सकडून सुळका चढाई मोहीम यशस्वी

Amit Kulkarni

राज्यात वीज दरवाढ होणार का?

Amit Kulkarni

बॉक्साईट रोडवर गांजा विकणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!