Tarun Bharat

हंदिगनूर सरस्वती हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाची तालुका पातळीवर निवड

Advertisements

वार्ताहर /अगसगे

सरस्वती हायस्कूल हंदिगनूरच्या मुलींच्या कबड्डी संघाची तालुका पातळीवर निवड झाली आहे. कडोली विभागीय स्पर्धा सरकारी हायस्कूल न्यू इदलहोंड (शिवापूर) येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सरस्वती हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाने सलग पाचव्या वर्षी अजिंक्यपद पटकावून तालुका स्तरावर खेळण्याचा मान मिळविला. या कबड्डी संघामध्ये आरती पाटील, ममता सनदी, रुतिका पाटील, तनुजा पाटील, स्नेहा बसर्गे, पुष्पा सनदी, नकुशा पाटील, हालव्वा अलगोंडी, गायत्री पाटील, स्वप्नाली पाटील, रसिका पाटील, अंकीता भांदुर्गे यांचा समावेश आहे.

शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. पाटील व क्रीडा शिक्षक एस. एल. मासेकर व जे. जी. कडेमणी, शिक्षिका ए. बी. खनगावकर व इतर सहशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Related Stories

कागवाड ग्रा. पं. ला नगरपंचायतीचा दर्जा

Patil_p

शास्त्रांचा अभ्यास करताना ऊर्जेला महत्त्व द्या

tarunbharat

रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालय झाले खुले

Rohan_P

कार – दुचाकी अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Rohan_P

सजावटीच्या साहित्याने बहरली बाजारपेठ

Amit Kulkarni

आठ दिवसांत 120 विनापरवाना व्यावसायिकांना नोटिसा

Amit Kulkarni
error: Content is protected !!