Tarun Bharat

हंदीगुंद ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

घरांचे उतारे देण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

रायबाग तालुक्मयातील हंदीगुंद गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्व्हे क्रमांक 17 मध्ये राहत आहे. मात्र आम्हाला अद्याप त्या घरांचे उतारे दिले जात नाहीत. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून तातडीने आमच्या घरांची नेंद करून उतारे द्यावेत, अशी मागणी हंदीगुंद ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली.

एकूण 9 एकर 13 गुंठे जमीन असून त्यामध्ये आम्ही 300 कुटुंबे गेली 60 वर्षे राहत आहोत. अनुसुचित जमातीबरोबरच इतर समाजातील गरीब कुटुंबे या ठिकाणी आहेत. 3 हजार लोकसंख्या आहे. इतक्मया मोठय़ा प्रमाणात वसती असूनदेखील ग्राम पंचायत आमची घरे नोंद करण्यास तयार नाही. तेंव्हा तातडीने ही घरे नोंद करून आम्हाला उतारे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

आंबेडकर आवास वसती योजना, बसव वसती योजना, इंदिरा आवास वसती योजनेंतर्गत ही घरे बांधून देण्यात आली आहेत. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी चुन्नाप्पा गगरी, रमेश देवरावर, बसू आजाप्पगोळ, कल्लोळीप्पा मेत्री, मल्लाप्पा देवरावर, मारुती आजाप्पगोळ, सदाशिव होसूर, जयवंत हादीमनी, लक्काप्पा व्हसाळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

शहरातील सांडपाणी ग्रामीण भागातील शेतात

Amit Kulkarni

प्रांताधिकाऱयांकडून अनमोड मार्गाची पाहणी

Omkar B

आगामी दोन महिने कसोटीचे

Patil_p

हुक्केरीत पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान

Omkar B

कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?

Patil_p

कर्नाटकात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी घट

Archana Banage