Tarun Bharat

गुजरातमधील ‘त्या’ आरोपींना फाशी द्या

विविध महिला संघटनांची निदर्शने

प्रतिनिधी /बेळगाव

गुजरातमधील मुस्लीम युवती बानू हिच्यावर लैंगिक अत्याचार करून सात जणांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र या सर्व आरोपींना गुजरात सरकारने सोडून दिले आहे. हा अत्यंत निंदनीय प्रकार असून त्या सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी विविध महिला संघटनांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लोकशाही नांदत असलेल्या देशामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱयांनाच जर अशाप्रकारे सोडण्यात आले तर महिला सुरक्षित राहतील का?, बानू व तिच्या कुटुंबीयांवर जो अन्याय, अत्याचार झाला आहे तो गंभीर आहे. या प्रकरणी मुंबईच्या सीबीआय न्यायालयाने या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र गुजरात सरकारने त्यांची सुटका केली आहे. त्यांना अटक करावी, यासाठी महिलांनी संपूर्ण देशभर आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून महिलांनी ही मागणी केली आहे. यावेळी विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Stories

स्वातंत्र्यलढय़ात बेळगावच्या सेनांनींचे मोठे योगदान

Patil_p

‘विंग्ज् इंडिया’ एरो शोमध्ये बेळगावच्या युवकाचा सहभाग

Amit Kulkarni

सिमेंट कंपन्यांनी दर स्थिर ठेवावेत, अन्यथा आंदोलन

Patil_p

एपीएमसी भाजी मार्केट टिकविणे ही सरकारची जबाबदारी

Amit Kulkarni

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेची उत्साहात सांगता

Patil_p

जिल्हय़ात रविवारी 65 नवे रुग्ण

Amit Kulkarni