राजकीय नेत्याच्या मुलासोबत रिलेशनमध्ये
अभिनेत्री हंसिका मोटवानीचा आज म्हणजेच मंगळवारी 31 वा वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी हंसिका आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये नायिका म्हणून झळकली आहे. हंसिकाने शाका लाका बूम बूम या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले होते. त्यानंतर ऋतिक रोशनचा चित्रपट ‘कोई…मिल गया’ या चित्रपटात ती दिसून आली होती.
हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. तमिळ अन् तेलगू चित्रपटांमध्ये ती दिसून येते. याचबरोबर अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये ती काम करत आहे. ‘दसमुदुरु’ या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर हिमेश रेशमियाचा चित्रपट ‘आप का सुरूर’मध्ये ती दिसून आली होती.
धनुष, सूर्या, विजय, अरविंद स्वामी आणि सिद्धार्थ यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ती मोठा चेहरा आहे. आता तिच्याकडे 7 चित्रपट असून यात राउडी बेबी, 105 मिनिट्स आणि पार्टनर यांचा समावेश आहे. याचबरोबर ती काही वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे.
हंसिका लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे समजते. एका दिग्गज राजकी नेत्यासोबत तिचा विवाह निश्चित झाला आहे. राजकीय नेत्याला या पुत्राला ती दीर्घकाळापासून डेट करत आहे. तिचा प्रियकर एक उद्योजक आहे.