प्रतिनिधी / फोंडा
वाडीवाडा-कुंडई येथे जय हनुमान मंदिरामध्ये 41 वा हनुमान जन्मोत्सव शुक्रवार 15 व शनिवार 16 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त शुक्रवार 15 रोजी संध्याकाळी 6 वाजता स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, संध्याकाळी 7 वा. अखिल भारतीय पद्मनाभ संप्रदायाचे 16 वे भारतीय प.पू. हंशराज स्वामी महाराज यांचे शुभआगमन, पाद्यपूजा, प्रार्थना, भगवद्गीता अध्याय वाचन, शांतीपाठ व त्यानंतर प्रमुख वक्ते चंद्रकांत गावस यांचे निरूपण, सुरेश गावस यांचे मार्गदर्शन व नंतर प.पू. हंशराज स्वामींचे आशीर्वचन, आरती, पसायदान, श्रीदर्शन व महाप्रसाद होईल. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण (भाई) जगन्नाथ नाईक (मांद्रे) हे करतील.
शनिवार 16 एप्रिल रोजी पहाटे 5 वा. हनुमान जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. केशव माधव शिवडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. त्यांना तबला व संवादिनीसाथ अनुक्रमे शैलेश गावकर, दत्तराज सुर्लकर यांची लाभेल. तद्नंतर संकटमोचन मारुतीयनमः अकरा हजार जप होईल. सकाळी 10 वाजता सामूहिक पाद्यपूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता नवदुर्गा महिला दिंडी पथक-कुंडईतर्फे दिंडीसह मारुतीरायांची पालखी मिरवणूक होईल. सर्व गुरुबंधू, भगिनी, ग्रामस्थ व भक्तगणांनी दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहून देवदर्शन व संतआशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष शाम महानंदू नाईक यांनी केले आहे.