आत्मदहन करण्याचा उमेश तळवणेकर यांचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील ओबीसी समाजासाठी ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी पेडणे तालुका सरकारी कार्यालयाकडून सतावणूक होत आहे. आठ दिवसांत ओबीसी बांधवाना प्रमाणपत्र मिळण्यासाठीची प्रक्रिया सुलभ न केल्यास उपोषण तसेच वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा उमेश तळवणेकर यांनी दिला.
ओबीसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना आणि समाजाचा दाखला मिळवण्यासाठी पेडणे तालुका मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातून ओबीसी समाज बांधवांची सतावणूक होत आहे. ओबीसी दाखला मिळवण्यासाठी आता लोकांकडून ते 1/14 चा उतारा मागत आहेत. पेडणे तालुक्मयातील ओबीसी समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिकदृष्टय़ा दाखला गरजेचा असतो. मात्र सरकारी अधिकाऱयांकडून अनेक अटी सांगून त्याला विलंब केला जातो. तीन ते सहा महिन्यांपासून मामलेदार कार्यालयात अर्ज पडून आहेत. त्याची दखल अद्याप घेतलेली नाही.
दरम्यान, आपण यात विशेष लक्ष घालतो असे आश्वासन यावेळी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी उमेश तळवणेकर यांना दिले आहे.
पेडणे पालिका क्षेत्रातील ओबीसी महिला दिया महेश नाईक यांनी सांगितले की आपले ओबीसी प्रमाणपत्र नूतनी करण्यासाठी आपण सहा महिन्यांपूर्वी दिले आहे. यापूर्वी अनेक वेळा आपण ते नूतनीकरण केले, मात्र आता त्यासाठी 1/14 चा जमीन दाखल्याचा उतारा हे कार्यालय मागत आहे. आणि त्याबाबत ऑनलाईन प्रक्रियेतून आपण कागदपत्रे सुपूर्द केल्यानंतर अधिकाऱयांनी तशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराचा आपल्याला मनस्ताप असल्याचे सांगितले.