Harassment to patients and residents due to improper work
येथील डॉक्टर जयेंद्र परुळेकर हॉस्पिटल शेजारी सुरू असलेल्या इमारत बांधकामाचे काम सुरू असताना येत असलेल्या आवाजामुळे रुग्णांना, शेजाऱ्यांना त्रास होत आहे. या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन हा आवाज थांबवण्यात यावा अशी मागणी डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. ते येथील सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.परुळेकर हॉस्पिटल शेजारी आठ वर्षापुवी निवासी संकुल उभे करण्यासाठी करण्यात आलेले बांधकाम पाडुन नव्याने सात मजली संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या अस्तीत्वात असलेले बाधकाम जेसीबीला ड्रील मशिन लावुन पाडण्यात येत आहे . त्याच्या आवाजामुळे रूग्णालयातील रुग्णांना तसेच आजुबाजुच्या रहिवाशांना त्रास होत आहे. या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन हा आवाज थांबवण्यात यावा अशी मागणी डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. ते येथील सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.ही इमारत राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची आहे आम्हाला काम करण्याबाबत कुठलाही आक्षेप नाही मात्र ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते चुकीचे आहे. रुग्णांना आणि रहिवाशांना आवाजामुळे त्रास होत आहे. ड्रिल मशीनमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही तडे जाण्याची शक्यता आहे . या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळवले. परंतु त्यांनी लक्ष घातले नाही . अशा पद्धतीने सुरू असलेले काम तत्काळ थांबवणे आवश्यक आहे .त्याऐवजी मनुष्यबळ वापरून ही इमारत पडणे आवश्यक आहे. अन्यथा ज्या पद्धतीने काम सुरू झाले आहे त्याचा त्रास आम्हाला आणखी महिनाभर त्रास सहन करावा लागणार आहे सध्या असलेले काम तत्काळ थांबवून मनुष्यबळ वापरून हे काम केले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे यासंदर्भात प्रशासक असलेले प्रांताधिकारी यांचेही लक्ष वेधण्यात येणार आहे . ही इमारत एका मंत्र्यांची आहे त्यांनी याबाबत लक्ष घालणे आवश्यक आहे. अन्यथा यासंदर्भात आम्हाला आवाज उठवावा लागेल यावेळी लक्ष्मीकांत पणदुरकर उपस्थित होते. मी वृद्ध असल्यामुळे या आवाजाचा त्रास होत आहे हृदयाची धडधड होते त्यामुळे अशा पद्धतीने सुरू असलेले काम बंद करण्यात यावी अशी माझी मागणी आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी