नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने राज्यसभा खासदार म्हणून मिळणारा सर्व पगार शेतकऱयांच्या कन्यांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा शनिवारी केली. हरभजन सिंह याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. हरभजनच्या या निर्णायानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर नुकतीच त्याने शपथ घेतली. त्यानंतर हरभजन सिंह याने शनिवारी ट्विट करत वेतन गरिबांच्या कल्याणकारी सेवेसाठी वापरण्यासंबंधीची महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘एक राज्यसभा सदस्यच्या रुपाने माझा सर्व पगार शेतकऱयांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी देणार आहे. देशाला आणखी उत्तम आणि कणखर करण्यात योगदान देऊ इश्चितो. त्यासाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे.’ असे ट्विट हरभजन सिंह याने केले आहे.