Tarun Bharat

हार्दिक पटेलांचा आज भाजप प्रवेश; ट्विट करत म्हणाले “मी मोदींचा छोटा शिपाई…”

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

२०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मुख्य टीकाकार आणि पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रवेश करण्याआधी हार्दिक पटेल यांनी सकाळी ट्विट करत आपण देशसेवेच्या उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं म्हटलं आहे.

माजी काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन”.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली होती. मी काँग्रेसमध्ये तीन वर्षे वाया घालवली, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती.

हार्दिक पटेल आज दुपारी १२ वाजता भाजप पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी गुजरातमध्ये पक्ष प्रवेशाचे पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्यात भाजपची सत्ता आहे. हार्दिक पटेल यांनी ट्वीट करून म्हटले की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एक नवा अध्याय सुरू करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात मी लहान शिपाई बनून काम करणार आहे.

२०१५ मध्ये, २८वर्षीय हार्दिक पटेलने पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंसक आंदोलन केले. एकेकाळी भाजपचे कट्टर टीकाकार असलेले पटेल यांच्यावर गुजरातच्या तत्कालीन भाजप सरकारने देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेल यांना काँग्रेसचे गुजरातचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते.  

Related Stories

कोरोना नियमांच्या अनास्थेवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

Patil_p

जि. प. पं. स. साठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Nilkanth Sonar

ट्रेनमध्ये अंतर्वस्त्रात फिरत होते आमदार

datta jadhav

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांना भेटणार पंतप्रधान

Patil_p

57 कैद्यांची जामिनावर मुक्तता

Patil_p

काँग्रेसला न्यायालयात खेचणार

Patil_p
error: Content is protected !!