Tarun Bharat

Hardik Patel :अखेर तारीख ठरली! हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले गुजरातचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel)भाजपात प्रवेश करणार आहेत. येत्या २ जून रोजी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थित ते पक्षात प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल यांनीच हि माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून हार्दिक पटेल हे काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसमधून बाहेर पडताना त्यांनी पक्षनेतृत्वावर घणाघाती टीका केली होती. तसेच अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करत भाजपाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले होते. अखेर काँग्रेसला राजीनामा देत आज त्य़ांनी कमळ हाती घ्यायचे ठरवलं.

या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कामाची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळे आता पटेल यांची नाराजी आणि त्यांचा राजीनामा काँग्रेसला महागात पडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

सातारा : कोरोनाचा तेरावा आठवडा जास्त दाहक : जिल्ह्यात भयकंप

Abhijeet Shinde

‘लादेन माझा गुरु’; UP मध्ये सरकारी कार्यालयात अधिकाऱ्याने लावला फोटो

Abhijeet Shinde

संसदेपर्यंत ट्रक्टर मार्च काढणार आंदोलक

Patil_p

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

datta jadhav

कोरोनाने ‘या’ देशात घेतले तब्बल 80 हजार बळी

datta jadhav

लोकसभेतून ऑफिस चालवू नका

Patil_p
error: Content is protected !!