Harihar Nachanolkar passed away
हरिहर महादेव नाचणोलकर वय वर्षे ९३ यांचे आज दि.३० जानेवारी रोजी मालवण येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांचे मूळ गाव नास्नोळा गोवा बार्देश होय.हरिहर नाचणोलकर यांनी सिंडिकेट बँक मध्ये २८ वर्षे सेवा केली होती. कसाल कणकवली सावंतवाडी या ठिकांनी ते कार्यरत होते,निवृत्ती नंतर ते मालवण येथे आपल्या गावी स्थायिक झाले.
सन १९८७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक चळवळीची बिजे त्यांनी रोवली,१९८७ साली मुंबई ग्राहक पंचायतचे श्री.माधव मंत्री यांच्या सहकार्याने सर्वप्रथम सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे पहिली बैठक त्यांनी घेतली व त्या नंतर ग्राहक पंचायतची काम सुरु केले. अनेक ग्राहकांना न्याय देण्यासाठी ते स्वतः ग्राहक न्यायालयात जवळ जवळ १५ ते १६ वर्षे केसीस चालवत असत. कितीतरी प्रकरणात त्यांनी ग्राहकांना न्याय मिळवून दिला आहे.अनेकांनी त्यांचे मार्गदर्शन व सल्ला लाभला आहे, ते प्रचंड न्यायनिष्ठूर होते, शिस्तप्रिय व सडेतोड व्यक्तीमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते.
मालवण / प्रतिनिधी