जालंधर :
अॅडव्होकेट हरजिंदर सिंह धामी हे तिसऱ्यांदा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे (एसजीपीसी) प्रमुख होणार आहेत. अकाली दलाने धामी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. परंतु त्यांच्या निवडीवर जनरल इजलासमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. धामी हे अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांचे निष्ठावंत मानले जातात.