कोलकाता
प्रीमियम बाईक निर्माती कंपनी हार्ले डेविडसनने नुकतीच आपली नवी बॅश/ एमटीएन ही इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. कंपनीची ही तिसरी सायकल असून याआधी मॉश /सीटीवाय व रश/ सीटीवाय या इलेक्ट्रिक सायकली बाजारात दाखल केल्या होत्या. दूरवरचा साहसी प्रवास करणाऱयांना ही सायकल पसंत पडेल, अशी आशा कंपनीने बाळगली आहे. 529 डब्ल्यूची याला बॅटरी असून 5 तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते. 30 ते 95 किलोमीटरचे अंतर ही सायकल कापते.