वार्ताहर /हरमल
क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आयोजित तालुकास्तरीय 17 वर्षाखालील शालेय विद्यार्थी बुद्धीबळ स्पर्धेत मुलींच्या गटात हरमल पंचक्रोशी हायस्कूलने तालुकास्तरीय जेतेपद पटकावले.
विजेत्या गटात श्रावणी तिळवे, त्रिषा ठाकूर, सुहानी केणी, तेजस्वी शेटकर व सुधा परब विध्यार्थ्यांचा समावेश होता. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक हेमंत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, हायस्कूलचे मुख्यध्यापिका स्मिता पार्सेकर, अध्यापक वर्ग तसेच पालक शिक्षक संघाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या यशाबद्दल पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.