प्रतिनिधी /पेडणे
हरमल समुद्र किनारी गोडय़ा पाण्याच्या तळय़ाजवळ एका ब्रिटिश महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पेडणे पोलिसांनी ज्वेयल विन्सन डिसोजा (वय 32, रा. हरमल) याला अटक केली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश महिला 2 जून रोजी सकाळी 11 वाजता हरमल गोडय़ा पाण्याच्या तळय़ाच्या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटत होती. त्यावेळी हरमल येथील ज्वेयल डिसोजा याने विनयभंग केल्याची तक्रार सदर महिलेने पेडणे पोलीस स्थानकात दिली. या तक्रारी नंतर पेडणे पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी सुरु केली. तक्रार दिल्यानंतर पेडणे पोलिसांनी 6 रोजी भारतीय दंड संहिता कलम 376 अंतर्गत गुन्हा नोंद करून संशयिताला अटक केली.
पेडणे पोलिसांनी मंगळवारी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आला. पुढील तपास पेडणे पोलीस करत आहेत.