Tarun Bharat

महिला वनडे मानांकनात हरमनप्रीत पाचव्या स्थानी

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकनात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने चार स्थानांची झेप घेत पाचवे स्थान मिळविले आहे. तिने इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात 111 चेंडूत नाबाद 143 धावा फटकावत भारताचा मालिकाविजय निश्चित केला होता.

या ताज्या मानांकनात भारताच्या अनेक खेळाडूंनी प्रगती केली असून इंग्लंडविरुद्ध मालिकेत 3-0 असा मालिकाविजय मिळविताना केलेल्या कामगिरीचा त्यांना लाभ झाला आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिप (आयडब्ल्यूसी) अंतर्गत घेण्यात येत असलेल्या सर्व मालिकांचा या मानांकनासाठी विचार केला जातो. भारताची आघाडीवीर स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांनाही बढती मिळाली आहे. स्मृतीने एका स्थानाची प्रगती करीत सहावे तर तिसऱया सामन्यात नाबाद 68 धावांची खेळी करणाऱया दीप्ती शर्माने 8 स्थानांची प्रगती करीत 24 वे स्थान मिळविले आहे. पूजा वस्त्रकार (4 स्थानांची प्रगती करीत 49 वे) व हरलीन देओल (46 स्थानांची प्रगती करीत 81 वे स्थान) या अन्य दोन भारतीय फलंदाजांनीही पुढे मजल मारली आहे.

गोलंदाजांत वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुरने एकदम 35 स्थानांची मजल मारत 35 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तिने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दोन सामन्यात चार-चार बळी मिळविले. माजी अग्रमानांकित वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी पाचवे स्थान मिळवित निवृत्त झाली.

फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या डॅनी वॅटने दोन स्थानांची बढती मिळवित 21 वे तर ऍमी जोन्सने चार स्थानाची मजल मारत 30 वे स्थान मिळविले. याशिवाय चार्ली डीनने 24 स्थानांची झेप घेत 62 वे स्थान मिळविले तर गोलंदाजांत तिने एका स्थानाची मजल मारत 19 वे स्थान मिळविले आहे.

अष्टपैलूंमध्ये विंडीजची कर्णधार हॅली मॅथ्यूजने प्रथमच अग्रस्थान मिळविले असून  न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत विंडीजने 2-1 असा विजय मिळविला मॅथ्यूजने त्यात 88 धावा व 5 बळी मिळविले. फलंदाजीच्या क्रमवारीतही तिने 21 वरून 18 व तर गोलंदाजांच्या क्रमवारीत आठवरून सहाव्या स्थानावर मजल मारली आहे.  न्यूझीलंडची फलंदाज लॉरेन डाऊनने 15 स्थानांची प्रगती करीत 55 वे स्थान मिळविले तर गोलंदाजांत हन्नाह रोवने दोन क्रमांकाची बढती मिळवित 33 वे स्थान मिळविले. याशिवाय अमेलिया केर (11 वे), जेस केर (21 वे), विंडीजची ऍफी फ्लेचर (41) यांनीही या गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रगती केली आहे.

Related Stories

जम्मू एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला

Patil_p

रोजगारनिर्मितीचा गाडा हळूहळू रुळावर

Patil_p

बिहारमध्ये सत्तापालट, संजद-राजद एकत्र

Patil_p

दिल्लीच्या जामिया नगरमध्ये मंदिर वाचवण्यासाठी मुस्लिमांची न्यायालयात धाव

Archana Banage

उत्तराखंड : कोरोनापेक्षा अधिक घातक ‘ब्लॅक फंगस’; मृत्यू दर 15.73 %

Tousif Mujawar

उत्तराखंडात : दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सर्वात कमी 19 नवे रुग्ण; कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

Tousif Mujawar
error: Content is protected !!