प्रतिनिधी/सावंतवाडी-
मळगावची सुकन्या कुमारी हर्षदा राजन कोंडये हि पुणे विद्यापीठाच्या `त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार’ सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील सर्वोत्कृष्टविद्यार्थ्यास हाहा पुरस्कार दिला जातो. उच्च व तंत्राशिक्षण मंत्री उदय सामंत,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.