ग्रामस्थांचा आरोप : गावात बेकायदेशीर 60 नवीन घरे,पंचायतीकडून पाहणी, 20 घरांच्या बांधकामांची माहितीच नाही
प्रतिनिधी /सांखळी
डिचोली तालुक्मयातील हरवळे गावातील कुमनिदाद जमिनीत सुमारे 60 बेकायदेशीर घरांचे बांधकाम करण्यात आले असून या विषयावर सविस्तर तक्रार हरवळे ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे. त्यावर सरपंच राजू मळीक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षण करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हरवळे कुमनिदादच्या सर्वे क्रमांक 73/74 जमिनीत सुमारे 60 घरे बेकायदेशीररित्या बांधण्यात आली असल्याचे तक्रार हरवळे गावातील पन्नासच्या आसपास नागरिकांनी केली आहे. त्याची दखल घेऊन हरवळे ग्रामपंचायत मंडळाने सदर जागेवर जाऊन नियमानुसार सर्वेक्षण केले. यात वीस घरांसंबंधीत बांधकाम विषयी कसलीच माहिती उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहितीही उपलब्ध झाली. यामुळे कुमलिदाद सदस्यांच्या कामकाज वर ग्रामस्थांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
स्थानिक गरीब नागरिकांना जमीन उपलब्ध करून द्या
गावातील काही स्थानिक गरीब नागरिकांकडे घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध होत नाही आणि परप्रांतीयांना गावातील कुमुनिदादच्या जागा सहज उपलब्ध कशा होतात. त्याच्यावरही मेहरबानी का? असा प्रश्न ही स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. गावातील गरीब नागरिकांकडे घर बांधण्यासाठी जमीन नसल्याने त्यांना कायद्यानुसार जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत ही काही जाणकार लोक व्यक्त करत आहे.
नियमानुसार कायदेशीर कारवाई होईल : सरपंच राजू मळीक
हरवळे पंचायत क्षेत्रात कोंमनिदाद जमिनीत परप्रांतीय लोकांनी बेकायदेशीर घर बांधणी केल्याच्या तक्रारी पंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी केल्या असून त्याची दखल ग्रामपंचायत मंडळाने घेतली. कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. या विषयी सर्वेक्षण करून पंचायतीने अहवाल तयार करून पुढील तपासणीसाठी वरि÷ अधिकाऱयांकडे पाठवला आहे, तर काही विषय न्यायालयात विचाराधीन असल्याने त्यांच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. तसेच याविषयी ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची दखल पंचायत मंडळ घेणार असल्याची माहिती सरपंच राजू मळीक यांनी या विषयावर बोलताना दिली.