Tarun Bharat

‘या’ राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला वाटतोय क्रॉस व्होटिंग चा धोका

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत :
राज्यसभा निवडणुकीत राजस्थानबरोबरच हरियाणामध्येही काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. 10 जूनच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची भीती असताना, काँग्रेस नेतृत्वाने आपल्या हरियाणातील 31 आमदारांना, सर्वोच्च नेते भूपिंदरसिंग हुडा यांच्यासह गुरूवारी नवी दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे.


पक्षाचे निष्कासित नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा आणि मीडिया समूहातील कार्तिकेय शर्मा यांनी हरियाणामधून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस नाराज झाली आहे. शर्मा यांना हरियाणात जेजेपीच्या 10 आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यांना भाजप तसेच अनेक अपक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे.


पक्ष नेतृत्व प्रथम सर्व आमदारांची बैठक घेणार असून त्यांना छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील रिसॉर्टमध्ये पाठवले जाईल.राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता टाळण्यासाठी पक्षाने सर्व आमदारांना नवी दिल्लीत बोलावले आहे.पक्ष नेतृत्व प्रथम सर्व आमदारांची बैठक घेणार असून त्यांना छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील रिसॉर्टमध्ये पाठवले जाईल. तरी ही क्रॉस व्होटिंग झाल्यास नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतर संबंधितावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे बन्सल म्हणाले.

Related Stories

100 जागा मागितल्या, मिळाली एकच

Patil_p

बंगाल हिंसाचार : मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई

Rohan_P

ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला

Abhijeet Shinde

पंजाबमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, 82 नवे रुग्ण 

Rohan_P

मविआच्या भेटीनंतरही भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम ?

Abhijeet Shinde

कुलदीप बिश्नोईंनी घेतली भाजप नेत्यांची भेट

Patil_p
error: Content is protected !!