Tarun Bharat

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ओम प्रकाश चौटाला दोषी; २६ मे रोजी शिक्षेची सुनावणी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला(om prakash chautala) यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्लीतील राऊज अवेन्यू कोर्टानं (Rouse Avenue Court) दोषी ठरवलं आहे. आता ओम प्रकाश चौटाला यांना २६ मे रोजी शिक्षणा सुनावण्यात येणार आहे. १९ मे रोजी न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आजच्या सुनावणीला ओम प्रकाश चौटाला उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना २०१३ मध्ये जेबीटी घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी आढळल्यानं त्यांना सात वर्ष आणि दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी २ जुलै रोजी शिक्षा संपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

दरम्यान, सीबीआयने २६ मार्च २०१० रोजीमाजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. ओम प्रकाश चौटाला यांनी १९९३ ते २००६ या कालावधीत ६.०९ कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या जमा केली आहे, जी त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा खूपच जास्त आहे.

२०१९ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या मालकीचे फ्लॅट, भूखंड आणि जमिनीचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली आणि हरियाणातील पंचकुला आणि सिरसा जिल्ह्यातील आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली होती.

Advertisements

Related Stories

मिरज शासकीय दूध योजनेतून ९७ हजारांचे साहित्य लंपास

Abhijeet Shinde

मिरजेत झाडाची फांदी अंगावर पडून तरुण जागीच ठार

Abhijeet Shinde

मुख्य सचिवांना मारहाण प्रकरण : अरविंद केजरीवाल – मनिष सिसोदिया यांची निर्दोष सुटका

Rohan_P

चेन्नईत कोरोनामुळे 9 वर्षीय सिंहिणीचा मृत्यू

Patil_p

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढी विरुद्ध काँग्रेसचे 11 जूनला देशव्यापी आंदोलन

Rohan_P

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!