वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या पहिल्या कनिष्ठ महिलांच्या विभागीय 2023 च्या हॉकी स्पर्धेत शुक्रवारी पाचव्या दिवशी हरियाणा, कर्नाटक, ओडिशा आणि मध्यप्रदेश महिला संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱया हरियाणाने उत्तर प्रदेशचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. हरियाणातर्फे रितिकातर्फे 18 आणि 59 व्या मिनिटाला असे 2 गोल तर मनीषा पटेलने पंचविसाव्या मिनिटाला उत्तर प्रदेशचा एकमेव गोल केला. दुसऱया सामन्यात उत्तराखंडने चंदीगढचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. उत्तराखंडतर्फे अमनदीप कौर, प्राची आणि मीनाक्षी यांनी प्रत्येकी 1 गोल तर चंदीगढतर्फे एकमेव गोल तम्मन्नाने केला. तिसऱया सामन्यात पंजाबने दिल्लीवर 4-1 अशा गोलफरकाने मोठा विजय मिळविला. पंजाबतर्फे स्विना राणीने 2 गोल तर लखवीर कौर आणि सुखजित कौर यांनी प्रत्येकी 1 गोल तर दिल्लीतर्फे कर्णधार शुभमने 1 गोल केला.
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या दक्षिण विभागीय स्पर्धेतील सामन्यात कर्नाटकाने आंध्रप्रदेशचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. कर्नाटकातर्फे कर्णधार यमुनाने 2 तर आर. दीपिका व सौम्या यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आंध्रप्रदेशतर्फे डी. हामजा, पी. मुजिया बेगम आणि श्रीवाणी यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. दक्षिण विभागीय स्पर्धेतील दुसऱया सामन्यात तामिळनाडूने पुडुचेरीचा 17-0 अशा एकतर्फी पराभव केला. तामिळनाडूतर्फे प्रियदर्शिनीने 6 गोल, कर्णधार एम. गोपिकाने 4 तर सौम्याने 3, अबरामीने 2 गोल, त्याचप्रमाणे नंदिनी प्रिया व संघमित्रा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अन्य एका सामन्यात केरळने तेलंगणाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.
पूर्व विभागीय स्पर्धेतील झालेल्या पहिल्या सामन्यात बंगालने आसामचा 2-1 असा पराभव केला. दुसऱया सामन्यात ओडिशाने झारखंडचा 3-1 असा पराभव केला. तिसऱया सामन्यात मिझोरामने बिहारवर 9-0 असा एकतर्फी विजय मिळविला. पश्चिम विभागीय स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मध्यप्रदेशने राजस्थानचा 11-1 असा पराभव केला.