सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हरियाणा शीख गुरुद्वारा (व्यवस्थापन) अधिनियम 2014 ची वैधता कायम ठेवली आहे. अधिनियमाच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱया याचिका न्यायाधीश हेमंत गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेटाळल्या आहेत. या अधिनियमाच्या अंतर्गत हरियाणामधील गुरुद्वारांच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य हरभजन सिंह यांच्याकडून 2014 मध्ये दाखल एका याचिकेवर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने देखील 2019 मध्ये अधिनियमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. राज्य विधिमंडळाकडे गुरुद्वारा व्यवस्थापनासाठी शाखा निर्माण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.