ऑनलाईन टीम/तरुण भारत
हसन मुश्रीफ (hasan musharif) यांच्या नावात राम (Ram) दाखवल्याने भाजप नेते समरजित घाटगे (samarjit singh ghatge) आणि हसन मुश्रीफ यांच्यात वाद सुरू झालाय. समरजित घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलंय. तसेच हे सगळं प्रकरण समरजित घाटगे यांना महागात पडणार असा इशारा मुश्रीफ यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केलं आहे. अन्यथा ते आमच्या पासंगाला देखील पुरणार नाहीत असं देखील दम मुश्रीफ यांनी दिलाय. गेल्या 50 वर्षांपासून मी राम नवमीला (ram navami) वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे असा सवाल देखील केला.
तर मुश्रीफ म्हणजे वडाचे भक्कम झाड असून कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय वाढत नाही असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्याचबरोबर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार असं देखील मुश्रीफ म्हणाले.