Hasan Mushrif ED Raid : ई़डीच्या छाप्याचं कारण माहित नाही. छापे पूर्ण झाल्यानंतरच कारण कळेल.चंद्रकांत गायकवाडांशी माझा काहीही संबंध नाही.शेतकऱ्यांच्या पैशातून हा कारखाना उभा केला आहे. शिवाय जावयाचा आणि कंपनीचा कोणताही संबंध नाही.विशिष्ट धर्माच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत का असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला आयकर विभागाने चौकशीला बोलवलं नव्हतं, मुलाला बोलवलं होत. कारखान्याशी माझा कोणताही संबंध नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी नव्याने तेचं आरोप केले आहेत. ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. ब्रिक्स कंपनी आता कारखाना चालवत नाही.चार वर्षापूर्वी इनकम टॅक्सचा छापा पडला होता त्यावेळी ईडीने कारवाई केली नाही. आता करण्याचे कारण काही समजले नाही. यापूर्वीच्या छोपेमारीत काही निष्पन्न झालं नाही.कुटुंबातील लोकांना त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलयं.
चंद्रकांत दादांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. याला उत्तर देताना मुश्रिफ म्हणाले की, भाजमध्ये जाण्याचा सवालच येत नाही. शरद पवारांशी चर्चा झाली का? असा प्रश्न विचारताच मुश्रिफ म्हणाले, शरद पवार यांच्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीला तयार आहे, सहकार्य करणार पण ईडी कोण चालवतं, आयकर विभाग कोण चालवतं? शोध घ्या. ईडी अधिकाऱ्यांचा काही दोष नाही, त्यांना आदेशानुसार कारवाई करत असल्याचेही ते म्हणाले.


previous post