Tarun Bharat

हसन मुश्रीफांच्या वाढदिवसावरून रामायण ; मुरगूड पोलिसात तक्रार दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या नावामध्ये प्रभू श्रीरामांचे (prabhu shree ram) नाव चित्रित केल्यामुळं नवा वाद निर्माण झाला असून मंत्री मुश्रिफांविरोधात मुरगूड पोलिसात (muragud police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच रामनवमी दिवशी जन्म झाला नसतानाही वाढदिवस साजरा करतात असा आरोप त्यांच्यावर लावला आहे.

हसन मुश्रीफ हिंदूंची मते मिळवण्यासाठी रामनवमीला जन्म झाल्याचे सांगून वाढदिवस साजरा करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. वडकशिवाले येथील प्रकाश बेलवाडे यांनी मुरगूड पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.

समरजितसिंह यांची मुश्रिफांवर टीका
रामनवमी दिवशी मंत्री मुश्रिफांचा वाढदिवस होतो. या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांचे नाव आहे. या जाहिरातीला राम नवमीची डिझाईन करण्यात आली आहे. याला भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी यावर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी अशा प्रकारे राम या शब्दाची डिझाईन कशी काय करू शकता तुम्ही रामापेक्षा मोठे आहेत का असा सवाल करत पोलिसात तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

Related Stories

इचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे

Abhijeet Shinde

संसद बरखास्त केल्यामुळे नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस

datta jadhav

हेलिकॉप्टर, 1 कोटी रुपये रोख, तीनमजली घराचे आश्वासन

Amit Kulkarni

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी शिरोळ येथे शेतकरी संघटनेचे नदी पात्रात उतरून आंदोलन

Abhijeet Shinde

शाहूवाडी येळाणे येथे चोरी; ३ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Abhijeet Shinde

घरावर दगड मारणारा जन्माला आलेला नाही- एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!