Hasan Mushrif माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या इडीच्या करावाई दरम्यान हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर ते स्वता आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. आमदार मुश्रीफांना मुंबई हायकोर्टांने ईडीला दोन दिवस अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही महीन्यापासून संताजी घोरपडे साखर कारखान्यातील गैरप्रकाराच्या आरोपाखाली ईडीच्या कारवाईचा ससेमिरा मागे लागलेल्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर दिड महिन्यात दोन वेळा ईडीने छापा टाकला होता. त्यावर ईडीकडून होणारी संभाव्य अटक थांबवण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टांने आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीच्या अटकेपासून संरक्षण देत पुढील दोन दिवस अटक करून नये असे ईडीला निर्देश दिले. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ हे आज दुपारी तीन वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करणार आहेत.

