Tarun Bharat

आमदार गणेश नाईकांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले भाजप आमदार गणेश नाईक (ganesh naik) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (high court) मोठा दिलासा दिला आहे. नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराबरोबरच बलात्काराचा गुन्हा देखील नोंद झाला होता. पण आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (HC granted anticipatory bail to BJP MLA Ganesh Naik in Rape case and arms case)

गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान (deepac houhan) या महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरूळ येथील पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गणेश नाईक यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आज यावर न्यायालयात सुनावणी झाली असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दीपा चौहान यांनी तक्रारी , ”गणेश नाईक यांनी माझ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. माझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला भाग पाडले. त्यामधून आम्हाला एक मुलगा देखील झाला. त्यानंतर आता गणेश नाईक मुलाला स्विकारण्यास नकार देत आहेत. ते आणि त्यांचा मुलगा मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी,” असे आरोप महिलेने केले होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानतंर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई पोलिस गणेश नाईक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. गणेश नाईक गेल्या अनेक दिवसांपासून नॉटरिचेबल होते. काही दिवसांनी डिएनए चाचणीसाठी तयार असल्याचं त्यांनी वकिलांमार्फत सांगितलं होतं. अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर

Abhijeet Shinde

शिवसेनेचा ‘हा’ मंत्री भाजप नेत्याच्या घरी, तर्कवितर्कांना उधाण

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन?

Abhijeet Shinde

काॅंग्रेसमध्ये नाराजी: आशिष देशमुख सचिवपद सोडणार; राजीनाम्याचं कारण काय?

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल होणार :  गृहमंत्री अनिल देशमुख

Rohan_P

मराठीला लवकरच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा

Patil_p
error: Content is protected !!