Tarun Bharat

HDFC चं HDFC बँकेत होणार विलीनीकरण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC LTD) आणि HDFC बँक यांचे विलीनीकरण होणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला नुकतीच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेडने मान्यता दिली आहे.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण झाल्यानंतर एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल. तर एचडीएफसी लिमिटेडचे सध्याचे भागधारक एचडीएफसी बँकेच्या 41 टक्के मालकीचे असतील. एचडीएफसी लिमिटेड, तिच्या दोन पूर्ण-मालकीच्या घटकांसह ज्यांच्याकडे उपकंपन्या आहेत त्यांचे एचडीएफसी बँकेच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 21 टक्के भांडवल आहे. पुढील आर्थिक वर्षात दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आले आहे.

एचडीएफसी लिमिटेडने सांगितले की, प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याच्या ग्राहकांना याचा फायदा होईल.

Related Stories

पाकिस्ताननेही दिला चीनला झटका; घातली ‘बिगो’ ॲपवर बंदी

datta jadhav

राऊतांवरील कारवाईमुळे आम्ही आनंदी; बंडखोर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

datta jadhav

आता उजनी धरणातून सुरू होणार विमानसेवा…

Abhijeet Khandekar

देशात मान्सूनचे 100 डेज्

Archana Banage

आसाममध्ये भाजपला धक्का; BPF ने सोडली साथ

datta jadhav

Kolhapur; कुख्यात इराणी हिसडा गँगच्या म्होरक्यासह चौघे अटकेत

Kalyani Amanagi