नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक गो डिजिट जनरल इन्शुरन्समध्ये 49 ते 60.90 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीद्वारे एचडीएफसी गो डिजिटमध्ये 10 टक्के इतका वाटा खरेदी करणार आहे. 24 ऑगस्टला याबाबतची बोलणी दोन्ही कंपन्यांमध्ये झाल्याचे कळते. विविध अटींसह एक करार करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. गो डिजिट लवकरच आयपीओ सादर करणार आहे.