नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीने व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. बँकेने 0.20 टक्के इतकी व्याजदरात वाढ केली असल्याची माहिती आहे. मेपासून आतापर्यंत बँकेने 0.80 टक्के इतकी दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरीता दोनवेळा यापूर्वी व्याजदरात वाढ केली आहे. याचाच एक भाग म्हणून एचडीएफसी बँकेनेही दर वाढवला
असून आता बँकेचा एमसीएलआर नवा दर 8.05 टक्के इतका झाला आहे.