प्रतिनिधी /वास्को
वास्को बायणातील रवींद्र भवनच्या कुंपणाला लागूनच असलेला कट्टा बुधवारी दुपारी मुरगावच्या प्रशासकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत त्या कट्टय़ावर दावा सांगणाऱया व्यक्तीनेच स्वताच्या हातानी हटवीला. त्यामुळे एका वादावर पडदा पडला आहे.
हा कट्टा एका धार्मिक पंथाचा असून पूर्वीपासून या ठिकाणी त्या पंथाच्या समुहाकडून धार्मिक विधी करण्यात येत होते. जवळपास विस वर्षांपूर्वी वेश्यवस्तीविरूध्द झालेल्या कारवाईनंतर तो कट्टा हटवण्यात आला होता. परंतु त्या पंथामधील एका ज्येष्ठ व्यक्तीने पुन्हा त्या ठिकाणी आपले धार्मिक कार्य सुरू केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कारवाई झाली होती. परंतु त्या व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा तोच प्रकार सुरू होत असे. त्या पंथामधील लोकांकडूनही या धार्मिक प्रथेला चांगला प्रतिसाद मिळत होता. रवींद भवनच्या नाक्यावरील हा धार्मिक प्रकार चर्चेचा व वादाचा विषय ठरला होता. त्यामुळे कट्टय़ाच्या नावाने जे काही त्या ठिकाणी मांडण्यात आले हेते, ते सर्व हटवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयांनी त्या व्यक्तीलाच राजी करून कारवाई वीना व्यत्यय यशस्वी केली. सध्या तो भाग मोकळा झालेला असून त्या ठिकाणी वाहने पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.