दिनांक 28-08-2022
मेष
तब्येतीचा पाया मजबूत राखण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. या आठवडय़ात एखादी घटना घडायची वाट बघाल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कौटुंबिक जबाबदाऱया आणि त्या पूर्ण करण्याकरता झालेला खर्च यामुळे थोडी चिंता वाटेल. इलेक्ट्रिक वस्तू किंवा अग्निजन्य सामान हाताळताना विशेष सावधानता बाळगावी.
गरजू व्यक्तीला वस्त्र दान करावे.
वृषभ
करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा काहीसा अनुभव या आठवडय़ात येऊ शकतो. तुम्ही केलेल्या उपकाराला समोरचा माणूस विसरून गेल्यामुळे मन खिन्न होऊ शकते. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा काहीसा संमिश्र असेल. पैशाची आवक वाढण्याबरोबर खर्चाचे प्रमाणही वाढेल. प्रेमप्रसंगांमध्ये यश मिळेल. व्यवहारी जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल.
हिरव्या रंगाची काचेची गोटी जवळ बाळगावी.
मिथुन
कुटुंबातील एखादी ज्ये÷ व्यक्ती तुम्हाला आयत्यावेळी जो सल्ला देईल त्यामुळे तुमचा फायदा नक्की होईल. नात्यांना समजून घेऊन स्पेस देणे गरजेचे असेल. तुमच्या कामांमध्ये नाविन्यता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक पाया मजबूत असेल. तब्येतीची विशेष अशी काही तक्रार असणार नाही. कामाच्या ठिकाणी इतरांशी गोड बोलून कामे करून घ्यावी. दिलेला शब्द पाळावा लागेल.
अशोकाचे पान जवळ ठेवावे.
कर्क
अति विश्वास ठेवल्याने नुकसान होऊ शकते. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज बांधून वागावे. या सप्ताहात चांगली कामे करण्याकरता तुम्हाला संधी मिळतील. त्यामुळे पुण्य अर्जित करण्याकडे लक्ष असावे. कौटुंबिक समाधान लाभेल. छोटे-मोठे वाद-विवाद सोडले तर वैवाहिक जीवनामध्ये अडचण येणार नाही. आर्थिकदृष्टय़ा काहीसा व समाधानकारक आठवडा असेल.
रात्री दुग्धजन्य पदार्थ टाळावे.
सिंह
तुम्हाला मानवेल आणि झेपेल इतकेच काम करावे. अतिताणामुळे शरीरावर आणि मनावर परिणाम होऊ शकतो कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते. पैशांच्या बाबतीमध्ये हा आठवडा सर्वसाधारण असेल. घराकरता खर्च कराल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये थोडे तणावाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन तिसऱया व्यक्तीमुळे बिघडू शकते.
विहिरीत रुपयाचे नाणे सोडावे.
कन्या
एखादी नवी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते आणि त्यामुळे आयुष्याला काही तरी वेगळे वळण लागू शकते. पण इथे सावधानतेचा इशारा असा आहे की लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा पारखून घेतलेले बरे. कुटुंबातील सदस्यांबरोबर एखाद्या विषयावरती चर्चा करून निर्णय घ्याल. आर्थिक बाबतीमध्ये समाधानी असाल पण कोणालाही उधारी देऊ नका. प्रेमसंबंधात मधुरता असेल.
गाईच्या खुराखालील माती जवळ ठेवा.
तूळ
या आठवडय़ामध्ये पैशापरी पैसा गेला आणि हाती काही लागले नाही अशा एखाद्या अनुभव येऊ शकतो. खर्च करत असताना आपली मर्यादा न विसरलेली बरी. ओळखी होतील त्यातून फायदाही होईल. मानसन्मानाचे योग येत आहेत. कुटुंबातील व्यक्तींना तुमच्या कर्तबगारीचे कौतुक वाटेल. प्रवास घडू शकतो. एखाद्या पाण्याच्या ठिकाणी भेट द्याल. प्रेमसंबंधात कटू अनुभव येण्याची शक्मयता आहे.
छोटे हळकुंड जवळ ठेवावे.
वृश्चिक
कामासंबंधी एखाद्या व्यक्तीशी वाद-विवाद होऊ शकतो पण पण त्याचे स्वरूप वाढू देऊ नका. पैशांची आवक तुलनेने जास्त असेल. एखाद्या प्रोजेक्टसाठी काही व्यक्तींशी बोलणे होईल. नवीन कल्पना सुचतील. पण त्या कृतीत आणल्याशिवाय फायदा होणार नाही. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. फक्त तब्येती सांभाळाव्यात. प्रेमसंबंधात एकमेकाला कमी लेखू नका.
जांभळा हात रुमाल जवळ ठेवावा.
धनु
जुन्या आठवणीमध्ये रमण्यापेक्षा आता असलेले वास्तव स्वीकारण्यामध्ये भलाई आहे. या आठवडय़ामध्ये कृतीवर भर द्यावा. आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या सगळय़ा सूचना या व्यर्थ नसतात हे लक्षात घ्या. आपल्या भल्यासाठी असणाऱया सूचना किंवा सल्ल्यांना स्वीकारा. आर्थिकदृष्टीने सर्वसामान्य असेल. तब्येत बिघडणार जरी नसली तरी कुपथ्य चालणार नाही. प्रेमींनी भावनांचा आदर करावा.
पिवळा हात रुमाल जवळ ठेवावा.
मकर
आपण जसे पाहतो तसेच जग दिसते, बघण्याची दृष्टी बदलली की जगही बदलते हे लक्षात येईल. व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. आर्थिक व्यवहार करत असताना समोरची व्यक्ती कशी आहे हे आधी ध्यानात घ्या. कौटुंबिक सुख उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी कष्ट जास्त करावे लागतील. प्रेमींनी गैरसमजाला थारा देऊ नये.
वृद्ध गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करावी.
कुंभ
नेकी कर और दरिया मे डाल असा जर ऍटीटय़ूड ठेवला तर हा आठवडा बऱयापैकी चांगला असेल. मात्र कुणाकडूनही परतफेडीची अपेक्षा करू नका. तुम्ही केलेल्या आणि फायदा झालेल्या कामांचे श्रेय दुसरे लाटण्याचा प्रयत्न करतील आणि चुका तुमच्या माथ्यावर फोडण्यात येतील. कौटुंबिक सुखाच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. आर्थिक आवक अपेक्षेइतकी राहील.
सफाई कर्मचाऱयांना मिठाई वाटावी.
मीन
कामाच्या ठिकाणी चाललेल्या राजकारणामुळे मन विचलित होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आपण बरे की आपले काम बरे असा ऍटीटय़ूड ठेवा. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. त्यामुळे कामे पूर्ण होतील. पण दुसऱयावर विसंबून राहण्यापेक्षा कामांचे नियोजन योग्य करून स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक समाधान असेल. तब्येत ठीक राहील. पायाची दुखणी त्रास देऊ शकतात.
कुत्र्याला चपाती खायला घालावी.
टॅरो उपायः
बरेचजण पैसा टिकत नाही अशी तक्रार करतात. त्याकरता उपाय. पैशाच्या पाकिटामध्ये कधीही पैसे घडी करून ठेवू नयेत. नोटा बरोबर नाणी ठेवू नयेत. पैशाच्या पाकिटात कुठलेही बिल किंवा इतर कागद ठेवू नयेत. स्वतःचे नाव आणि ‘धनवान’ असे लिहून तमालपत्र पाकिटात ठेवावे.