करमाळा / प्रतिनिधी :
करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक किशोर भागवत (वय ४८) यांनी पोफळज (ता.करमाळा) येथील रेल्वे रूळावर पहाटे अडीचच्या सुमारास आत्महत्या केली. भागवत यांच्या खिशातील एटीएम कार्ड व मोबाईलवरून त्यांची ओळख पटली आहे. या घटनेमुळे करमाळा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
किशोर भागवत करमाळा नगरपरिषदे नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नी माया भागवत या सिताबाई परदेशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. भागवत यांनी मोटारसायकल बाजूला लावून रेल्वेरूळावर उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या जोराच्या धडकेत त्यांचा चेहरा विद्रुप झाला असून पाय तुटलेला आहे. त्यामुळे त्यांना ओळखणे तसे कठीण गेले. परंतू, जवळील वस्तूवरून त्यांची ओळख पटली. भागवत यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात