Tarun Bharat

हेडफोनमुळे श्रवणशक्तीवर परिणाम

2050 पर्यंत 250 कोटी लोक होऊ शकतात बहिरे

फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल इन्स्टीटय़ूटच्या संशोधनातून फ्रान्समध्ये चारपैकी एका व्यक्तीला ऐकताना त्रास होत असल्याचे आणि ते हळूहळू बहिरे होत चालल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ देशातील 25 टक्के लोकसंख्या यामुळे प्रभावित होत आहे.

Advertisements

नैराश्य अन् गोंगागट

पहिल्यांदाच फ्रान्समध्ये अशाप्रकारचे संशोधन व्यापक स्तरावर करण्यात आले असून यात 18-75 या वयोगटातील 1,86,460 लोकांना सामील करण्यात आले होते. पूर्वी केवळ लहान स्तरावर संशोधन करण्यात आले होते, परंतु यंदा करण्यात आलेल्या संशोधनानुसार लोकांना ऐकण्यात समस्या लाइफस्टाइल, सोशल आयसोलेशन आणि नैराश्य व गोंगाटाच्या संपर्कात आल्याने होत आहे.

समस्येची तीव्रता अधिक

काही लोकांमध्ये मधूमेह आणि नैराश्यामुळे ऐकण्यास समस्या येत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. तर काही लोकांना एकाकीपणा, शहरी गोंगाट आणि हेडफोनच्या वापरामुळे हा त्रास होतोय. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे 150 कोटी लोक कुठल्या न कुठल्या स्वरुपात श्रवणशक्तीतील समस्येला सामोरे जात आहेत. ही संख्या 2050 पर्यंत वाढून 250 कोटी होण्याची शक्यता आहे. याचमुळे याला आरोग्य समस्येच्या स्वरुपात पाहिले जात आहे.

हियरिंग एडचा वापर

फ्रान्समध्ये श्रवणशक्तीची समस्या असलेल्यांपैकी केवळ 37 टक्के लोकच हियरिंग एडचा वापर करतात. धूम्रपान करणारे आणि बीएमआय अधिक असलेले लोक देखील हियरिंग एडचा कमी वापर करत आहेत. वाढती समस्या पाहता मागील वर्षी फ्रान्सच्या आरोग्य विभागाने मोफत हियरिंग एड लोकांना उपलब्ध केले होते. हियरिंग एडसाठी विम्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

Related Stories

विषारी मद्य अन् ब्रेडमुळे बिघडली 500 सैनिकांची प्रकृती

Patil_p

पाकिस्तान : 26/11 हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक

datta jadhav

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी पार

datta jadhav

विदेशातून 8.43 लाख लोक केरळमध्ये परतले

Patil_p

नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकन

Patil_p
error: Content is protected !!