Tarun Bharat

आरोग्यासाठी लाभदायी ‘बीट’; काय आहेत फायदे वाचा…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे (health) दुर्लक्ष करतो. तसेच आहाराकडेही दुर्लक्ष करत असतो. तर अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला, आरोग्याची कोळजी घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. रोजच्या आहारात बीटचा (Beetroot) वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत.

ज्या लोकांना फिटनेसची आवड आहे त्या लोकांच्या आहारामध्ये सॅलेडचा समावेश हा नक्कीच असतो. यासोबतच काही जण ताज्या फळांचा ज्यूस पिण्याला पसंती देतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी सॅलेड खातात. मात्र, सॅलेड हे आपल्या शरिराला अनेक प्रकारचे फायदे मिळवून देते. यामध्ये बीट आरोग्यदायी आहे.

बीट मध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंटस (विशेषतः बीटागीन) शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.

आपल्याला जर काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या तर डॉक्टर देखील आपल्याला या बीटाचे सेवन करण्यास सांगतात. थंडीच्या दिवसांमध्ये या बीटाची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यामुळे बीट खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

बीट खाण्याचे फायदे-

१. रक्तदाब नियंत्रणात राहतो
दररोज आहाराबरोबर बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा 1-1 कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होता. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या.

२. रक्ताची कमतरता भरून काढते
वाढत्या दगदगीमुळे पौष्टिक खाण्याकडे लक्ष नसते. त्यामुळे अनेक त्रास उद्भवू शकतात. रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज बीट खाल्यामुळे लीवरची सूज देखील कमी होते

३. कफचा त्रास
बीटमुळे खाल्याने कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते.

४.कॅल्शिअमची स्रोत
बीट शरीराला कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं तत्व आहे. कॅल्शिअममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खालं पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

५. सांधे दुखी थांबते
बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात.

६. गॅसची समस्या दूर होते
बदतल्या वातावरणामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅसचा त्रास उद्भवतो. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात. बीट रोज खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

७. महिलांसाठी लाभदायक
बीटमध्ये फॉलिक अॅसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं. बीटमुळे दूध वाढतं.

८. थकवा दुर करते
एका संशोधनात सिध्द झाले की, बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमिन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपुर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते

९. कॉलेस्ट्रॉल कमी करतो
बीटमध्ये फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन मोठ्या प्रमाणात असते. बीटासायनिनमुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडेंट आहे. हे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो.

Related Stories

लॉकडाउन काळात करा तीन सोपे व्यायम

Omkar B

जाणून घ्या नैसर्गिक कापराचे अफलातून फायदे

Kalyani Amanagi

झोप कमी, जाडीची हमी!

Omkar B

आकार बदलतोय

Omkar B

धनी ऍप सुरु करणार २५ लाख कुटुंबांसाठी मोफत कोविड केअर औषधांचे वितरण

Archana Banage

अधोमुखवृक्षासन

Omkar B