जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याची पाने वापरली जातात.डाळ,आमटी,कढी मध्ये या मध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्त कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत.फकत केस आणि त्वचाच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्यांवर कढीपत्ता गुणकारी ठरतो.कढीपत्त्यामध्ये कर्बोदक,फायबर , कॅल्शिअम,फॉसफरस आर्यन आणि व्हिटॅमिन C ,व्हिटॅमिन B,आणि व्हिटॅमिन E असल्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. चला तर मग आज जाणून घेऊयात याचे अजून कोणते फायदे आहेत.
केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे अशा केसांच्या अनेक समस्यांवर कढीपत्ता बहुगुणी ठरतो. कडीपत्ता आणि दह्याचा मास्क केसांना लावल्यास फायदेशीर ठरतं. याशिवाय नारळाचे तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने काळी होईपर्यंत ठेवून हे तेल केसांना लावल्यास याचा केसांच्या वाढीसाठी नक्कीच फायदा होतो.
अनेक त्वचाविकारांवर कढीपत्ता हा उत्तम उपाय आहे.त्वचेवरील सुरकुत्या,पिंपल्स,रॅशेस तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी कढीपत्ता उपयोगी आहे. कढिपत्त्याचा रस आणि हळद किंवा मुलतानी माती यांचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास नक्कीच परिणाम दिसून येईल.
शरीरातील लोह कमी झाल्यामुळे अॅनिमिया होतो.अशावेळी सकाळी उपाशी पोटी तुम्ही एक खजूर आणि कढीपत्याची काही पाने खाल्ल्यास त्यातील पोषक तत्वे तुमचा अॅनिमिया दूर करेल.
वजन नियंत्रित ठेवण्यास कढीपत्ता उपयुक्त आहे कढीपत्ता आहारात समाविष्ट केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
(टीप – वरील सर्व माहित सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

