प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ, मृत्युंजयनगर येथील सिद्धकला युथ क्लब आणि दक्षता हॉस्पिटल यांच्यावतीने एस. व्ही. रोड येथे दोनदिवशीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी या शिबिराचे उद्घाटन युथ क्लबचे अध्यक्ष अरुण गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दक्षता हॉस्पिटलचे डॉ. अमित शहा, डॉ. शरयु, स्नेहल कुंडेकर, प्रगती पालेकर व सहकारी उपस्थित होते.
या सर्वांचे स्वागत करण्यात आले. या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. दक्षता हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेतला. शुक्रवारीही या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी क्लबचे सदस्य गणेश प्रभू, अरविंद पालेकर, उदय लोहार, नागेश कंग्राळकर, परशराम हुंदरे, किशोर गजगेश्वर, जगन्नाथ शानभाग, सौरभ आठवले आदी उपस्थित होते.