बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व शरद केशकामत फौंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्मयातील हब्बनहट्टी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. माजी तालुका पंचायत अध्यक्ष व हब्बनहट्टी देवस्थान समितीचे अध्यक्ष जयराम देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक व शरद केशकामत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. संजीव नाईक, प्रकाश बडकुंद्री, गोविंद मिसाळे व ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
अशोक नाईक यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱया उपक्रमांविषयी माहिती दिली. जयराम देसाई यांनी रोटरी क्लबचे कौतुक करत ग्रामीण भागात अशी शिबिरे राबवावीत, असे आवाहन केले. या शिबिरात 235 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. हे शिबिर लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉ. संजीव नाईक, डॉ. प्रशांत गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सूत्रसंचालन रमेश गावडे यांनी केले. चिदंबर गावकर यांनी आभार मानले.