बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे खानापूर तालुक्यातील गव्हाळी येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. हे गाव खानापूर तालुक्याच्या घनदाट जंगलात वसलेले असून खानापूरहून 25 कि.मी.वर आहे.
आयुर्वेदिक डॉ. सुनिधी, डॉ. कुमार, डॉ. निकिता, डॉ. ऐश्वर्या मगदूम, डॉ. ओमकार खतकर, डॉ. स्वप्नालिका, श्रीधर के., नारायण यांनी शिबिराचे आयोजन केले होते. डॉक्टरांनी लोकांची तपासणी केली. लोककल्पतर्फे मोफत औषधे देण्यात आली. यावेळी अंदाजे 200 लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, सूरजसिंग राजपूत, प्रितेश पोतेकर, अनंत गावडे यावेळी उपस्थित होते.