कणेरीमठ परिसरातील 64 गावांतील पाण्याच्या स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण
174 अधिकारी व कर्मचारी तैनात
मठापासून 20 किलोमीटरच्या परिघातील गावांवर वॉच
कोल्हापूर प्रतिनिधी
कणेरीमठातील 20 की.मी. परिघातील एकुण 64 गांवातील प्रतिबंधात्मक सर्व पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करुन निर्जतुकीकरण करणेत आलेले आहेत, 170 पाणी नमुने जैविक व रासायनिक तपासणी करण्यात आलेले असुन सर्व पाणी नमुने योग्य आहेत. यामध्ये खाजगी 193 स्त्रोतांचे शुध्दीकरण केले आहे. मागील 20 दिवसामध्ये 20 कि.मि परिघातील एकुण 64 गांवातील परिसरातील कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात आलेले असून फॉगींगसह अन्य उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा 20 कि.मी परिसरामध्ये सोमवारपासून कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. उपचारात्मक उपाययोजना 10 आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्य पथकामध्ये 5 खाटाची सुविधा करण्यात आली असून इतर 6 पथकामध्ये 2 बेडची सुविधा करणेत आली आहे व 3 बफर पथक ठेवणेत आले आहेत. आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी असे एकुण 174 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कंट्रोल रुमची स्थापना
आरोग्य विभाग कंट्रोल रुम व रिपोर्टिंग कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी या मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत अहवाल व इतर विभागावर समन्वय ठेवण्याची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
आपत्कालिन परिस्थितीसाठी विशेष उपायायोजना
संभाव्य आपत्कालीन परिस्थीती म्हणजेच चेंगराचेंगरी, अन्नविषबाधा, भाजणे, वाहन उपघात, उष्माघात इत्यादी परि स्थीती मध्ये आरोग्य सेवा देणे कामी विशेष उपाययोजना केल्या आहेत. कोविड सदृश रुग्ण आढळल्यास त्वरीत उपचार व संदर्भ सेवा व्यवस्थापन, रॅपिड अँन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर तपासणी, लसीकरण, ऑक्सीजन बेड व्यवस्था करण्यात आलेली आहे.पुरेसा औषधसाठा व साधन सामुग्री उपलब्ध करुन ठेवणेत आलेली आहे.
संदर्भ सेवेसाठी रुग्णालये उपलब्ध
वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 25 खाटा, ग्रामीण रुग्णालय गांधीनगर व कागल प्रत्येकी 10 खाटा, नजीकच्या 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक 5 खाटा व सिध्दगिरी संस्थान हॉस्पीटल मील 150 खाटा असून रुग्णसेवेची परिपूर्ण तयारी केली आहे. खाजगी रुग्णालयांच्या यामध्ये समावेश केला आहे.
रुग्णवाहिका सेवा तैनात
आपत्कालिन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 10 रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या असून 05 रुग्णवाहिका या 108 (2 एएलस, 3 बीएलएस) व 05 रुग्णवाहिका 102 च्या असतील.