Orange Peel Tea Benefits : आजकाल ग्रीन टीचा ट्रेंड आहे. ग्रीन टी आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅफिन, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड आढळतात, जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने लठ्ठपणा आणि मधुमेहात आराम मिळतो. यासोबतच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. यासाठी डॉक्टरही ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. ग्रीन टीचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक म्हणजे संत्र्याच्या सालीचा चहा. संत्री खाल्ल्यानंतर सहसा लोक साले फेकून देतात. काही लोक संत्र्याच्या सालीने दात घासतात. असे मानले जाते की संत्र्याच्या सालीने दात घासल्याने दात पांढरे होतात. याशिवाय संत्र्याची साल ही पोटासाठी देखीाल फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीच्या चहाचे फायदे काय आहेत याची माहिती सांगणार आहोत.चला जाणून घेऊया.
संत्र्याच्या सालीच्या चहाचे फायदे
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते.व्हिटॅमिन-सी युक्त अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.विशेषत: हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात.त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.त्याचबरोबर संत्र्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते.यामुळे शरीर हायड्रेट राहते.यासाठी हिवाळ्यात संत्र्याचे सेवन करावे.याशिवाय संत्र्याच्या सालीमध्ये आवश्यक पोषक घटकही आढळतात,जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.त्याच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.तसेच पचनसंस्था मजबूत होते.हा चहा प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. तसेच मेटाबॉलिज़्मला देखील चालना देते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. त्याचबरोबर संत्र्यामध्ये असलेले फायबर अन्नाचे योग्य पचन करते.
चहा कसा बनवायचा
संत्र्याचा चहा बनवण्यासाठी दीड कप पाण्यात दालचिनी, २-३ काळी मिरी आणि गूळ मिसळून चांगले उकळा. आता त्यात संत्र्याची साल टाका. नंतर चहाला थोडा वेळ उकळू द्या. चहा चांगला उकळला की. नंतर गाळणीच्या मदतीने गाळून चहाचा आनंद घ्या.
Disclaimer : वरील दिलेल्या टिपा आणि सूचना या सामान्य माहितीवर आधारीत आहे. आजार किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास,डॉक्टरांचा सल्ला घ्या.


previous post