ऑनलाईन टीम/तरुण भारत
जर तुम्ही देखील तोंडात व्रण किंवा अल्सर येण्यामुळं त्रस्त असाल तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा. याचा तुम्हाला उपयोग होईल. प्रत्येकाला कधीना कधी तोंड येणं किंवा तोंडात उष्णता उठते. अशा प्रकारे तोंडात व्रण येणे सामान्य आहे, परंतु ते खूप वेदनादायक असतात. जेव्हा तोंडात फोड येतात, तेव्हा खाण्यापिण्यात खूप अडचण येते. तोंडातील हे व्रण बरे करण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध असली तरी काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तोंडातील व्रण (Mouth Ulcers Treatment) बरे करू शकता.
तोंडाला व्रण होण्याचे कारण?
तोंडात असे व्रण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जास्त मसालेदार अन्न किंवा गरम अन्न, पोट खराब होणे किंवा बद्धकोष्ठता यामुळे तोंडात असे व्रण येऊ शकतात. काही लोक सुपारी वगैरे खाल्ल्यानंतर रात्री तोंड स्वच्छ न धुता झोपतात, असे केल्याने तोंडात फोडही येतात. या व्यतिरिक्त, तंबाखू, पान-मसाला आणि धूम्रपान यामुळे तोंडाला व्रण होतात. मानसिक तणाव हे देखील तोंडाला अल्सर होण्याचे एक कारण आहे.
तोंडातील अल्सरवर घरगुती उपाय
तोंडात येणाऱ्या फोडांपासुन बचाव करण्यासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15 मिनिटांनी ती पेस्ट धुवावी.
मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्या तोंडातील अल्सर बरा करण्यास मदत करतात. जर आपल्याला या समस्येतून त्वरित आराम हवा असेल, तर तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी मध लावा. त्यामुळे लवकरच आराम मिळेल.
फोडांवर कोरफड लावल्यास जळजळ कमी होते. तसेच कोरफडमध्ये असलेले रासायनिक पदार्थ जखम भरण्यास मदत करतात.
टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. फोड्यांवर हे तेल लावल्यास फरक पडतो. एका दिवसातून तीन ते चार वेळा फोड्या असलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो.
फोडांवर थंड पदार्थ ठेवल्याने फायदा होता. त्याठिकाणी बर्फ लावण्यास वेदना आणि सूज कमी होते.
दुधामध्ये कॅल्शियम असतं, जे फोडांच्या व्हायरसोबत लढण्याचं काम करतं. शिवाय कॅल्शियममुळे झीजही लवकर भरण्यास मदत होते.
ज्येष्ठमधातील औषधी गुणधर्मामुळे अल्सरमुळे होणारी दाहकता कमी होण्यास मदत होते. ज्येष्ठमधाच्या काड्या किंवा पावडरच्या स्वरुपात ज्येष्ठमध उपलब्ध असते. ज्येष्ठमधाची काडी असल्यास ती उगाळून त्याची पेस्ट अल्सरवर लावा. जर तुमच्याकडे ज्येष्ठमधाची पावडर असेल, तर ती मधात एकत्र करून लावा. तसेच ज्येष्ठमधाची पावडर आणि हळद गरम दुधात टाकून ते दिवसातून तीनदा घ्या.